बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेन वॉर्नने स्वत:ला दिला होता जुलैपर्यंतचा वेळ, शेवटच्या पोस्टची होतेय चर्चा

मुंबई | ऑस्ट्रेलियाचा सर्वोतृष्ट लेग स्पिनर शेन वॉर्न याचं शुक्रवारी हृदय विकाराच्या झटक्याने दु:खद निधन झालं. फक्त ऑस्ट्रेलियाच नाही तर जगभरात शेन वॉर्नचा मोठा चाहतावर्ग होता. शेन वॉर्नच्या अकस्मित मृत्यूने सर्वांनाच मोठा धक्का बसला.

मृत्यूच्या काही दिवस आधी शेन वॉर्नने केलेली इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत आली आहे. शेन वॉर्नने स्वत:ला जुलैपर्यंतचा वेळ दिला होता. मात्र, त्याने ठरवलेली गोष्ट पूर्ण होण्याआधीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. शेन वॉर्नच्या निधनानंतर त्याची ही शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल होत आहे.

शेन वॉर्नने त्याचा एक जूना सिक्स पॅक असलेला फोटो शेअर केला होता. त्यासोबत जुलैपर्यंत काही वर्षापूर्वीच्या या आकारात परत यायचं उद्दिष्ट आहे. फिटनेसच्या दृष्टीने एक पाऊल उचललं, असं कॅप्शन शेन वॉर्नने लिहिलं होतं. मात्र, वॉर्नने निधनाच्या चार दिवस आधी केलेली ही पोस्ट त्याच्या आयुष्यातील शेवटची पोस्ट ठरली आहे.

दरम्यान,फिटनेस प्रेमी आणि तंदुरूस्त खेळाडू म्हणून वॉर्नची ओळख असली तरी निवृत्तीच्या काही काळानंतर तो थोडा स्थूल झाला होता. त्यामुळे पुन्हा जुन्या आकारात येण्यासाठी आणि फिट दिसण्यासाठी त्याने स्वत:ला जुलै महिन्यापर्यंतचा वेळ दिला होता. शेन वॉर्नच्या निधनानंतर जगभरातील सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shane Warne (@shanewarne23)

थोडक्यात बातम्या-

ऊर्जामंत्र्यांवर 302 चा गुन्हा दाखल करा; स्वा. शेतकरी संघटना आक्रमक

विकेंडनंतर 2 दिवस राज्याच्या ‘या’ भागात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

‘मोदीजी आम्हाला वाचवा, नाहीतर आम्ही मारले जाऊ’; विद्यार्थ्यांची आर्त हाक

“रात्री माझे व्हिडीओ बघतात आणि सकाळी…”; पुनम पांडे भडकली

एसटी कर्मचाऱ्यांना अनिल परब यांचं महत्त्वाचं आवाहन, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More