Top News बुलडाणा महाराष्ट्र

घेतलं बरं का मिटवून…. त्या चिमुकल्यांच्या भांडणाचा अखेर गोड शेवट, पाहा व्हिडीओ-

बुलडाणा | संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या दोन चिमुकल्यांच्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मोठ्या संख्येनं हा व्हिडीओ शेअर केला जात असून या भांडणाचं कौतुक महाराष्ट्रातील तमाम जनता करताना दिसत आहे. या व्हिडीओतील दोघांच्या डायलॉग्जमुळं हे शक्य झालं आहे.

कळंबेश्वर, तालुका मेहकर, जिल्हा. बुलडाणा येथील हा व्हिडीओ आहे. मिळालेल्या माहितीनूसार हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गावकऱ्यांनी दोघांचं भांडण मिटवून टाकलं आहे. यासंदर्भातील फोटो देखील आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

चिमुकल्यांमध्ये भांडणं होत असतात, त्यात काही विशेष नाही. मात्र या दोघांनी जे डायलॉग्ज वापरले होते, ते संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारे ठरले. त्यामुळे हा व्हिडीओ काही तासातच महाराष्ट्रातील घराघरात पोहोचला.

एकजण दुसऱ्याला “तुला एका चापटीतच खाली पाडीन, दुसरी लागूच देणार नाही, म्हणतोय… तर दुसरा पहिल्याला नुसता शंकरपाळ्या म्हणून चिडवताना दिसत आहे. या दोन्ही डायलॉग्जनी महाराष्ट्रातील जनतेच्या मनात घर केलं असून दोन्ही पोरं चांगलीच प्रसिद्ध झाली आहेत.

“शंकरपाळ्या” या एका शब्दाला घेऊन हजारो मिम्स आज दिवसभरात सोशल मीडियात टाकण्यात आले आहेत. मिम्ससंदर्भातील काही मराठी ग्रुपवर तर आज याच विषयानं वर्चस्व गाजवलेलं पहायला मिळालं.

दुसरीकडे शंकरपाळ्या ही काय भानगड आहे, याची अनेकांना कल्पना नव्हती. मात्र जेव्हा त्यांनी यासंदर्भातील या दोन मुलांचा व्हिडीओ पाहिला तेव्हा त्यांना याची कल्पना आली. आज दिवसभरात अनेकांना या व्हिडीओनं खळखळून हसवलं आहे.

दरम्यान, दुसरा पहिल्याला शंकरपाळ्या का म्हणत होता याचाही उलगडा झाला आहे. गावाकडे वीक पॉईंट शोधून एखाद्याला टोपन नाव पाडलं जातं. तसंच या व्हिडीओतील पहिल्याला शंकरपाळ्या आवडत असतात, त्यामुळे त्याला इतर मुलं शंकरपाळ्या म्हणून चिडवत असल्याचं समजत आहे.

दोघांच्या भांडणाचा गोड शेवट झाल्याचे फोटो देखील सोशल मीडियात शेअर झाले आहेत. कुणी याला मिटवून घेतलं म्हणत आहे, कुणी सेटलमेंट केली असं म्हणत आहे तर कुणी याला युती-आघाडी अशी नावं देत आहेत. मात्र या दोघांनी आजचा दिवस सोशल मीडियावर गाजवला एवढं मात्र नक्की…

संपूर्ण व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार घोषित

टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलीस अॅक्शनमध्ये; ‘या’ चॅनेलवर केली मोठी कारवाई

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून महाराष्ट्राच्या 57 शूर पोलिसांना पदक जाहीर

टाटांची बहुचर्चित सफारी 26 जानेवारीला लाँच होणार; जाणून घ्या वैशिष्ट्यं

पोटच्या मुलींची हत्या केली; म्हणाले, सकाळी पुन्हा जिवंत होणार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या