Top News विधानसभा निवडणूक 2019

मावळतीचा इतिहास बघणारे आपण नाहीत… आपण उगवतीचा इतिहास घडवणारे आहोत- शरद पवार

अहमदनगर |  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अहमदनगरमध्ये बोलताना पवार चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. यावेळी राष्ट्रवादी सोडून जाणाऱ्यांवर त्यांनी तोफ डागली. जे सोडून गेले त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असं पवार म्हणाले.

आपण मावळतीचा इतिहास बघणारे नाहीत तर उगवतीचा इतिहास घडवणारे आहोत हे विसरून चालणार नाही. अनेकजण आपल्याला सोडून गेले त्यांना येणाऱ्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ, असं पवार म्हणाले.

नगरसारखा जिल्हा हा शेतीप्रमाणे शिक्षणातही पुढे आहे. मात्र आज त्यांना नोकऱ्या कुठेही मिळत नाही. ही सत्ता आमच्याकडे आल्यास रोजगारात देशातील क्रमांक एकचे राज्य म्हणून महाराष्ट्राचे कौतुक होईल यात शंका नाही, असंही पवार म्हणाले.

प्रतिगामी विचारांची, जातीयवाद निर्माण करणारी, काळ्या आईचा इमान राखणाऱ्या शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करणारी भाजपा आणि तत्सम संघटनेला चले जाव सांगण्याचे काम आपण करायचे आहे, असं म्हणत काँग्रेस राष्ट्रवादीला आगामी काळात सत्ता देण्याचं आवाहन शरद पवार यांनी केलं.

महत्वाच्या बातम्या-

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या