मुंबई | उद्या(10 जून) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज फेसबुक लाईव्ह करून कार्यकर्त्यांशी आणि सर्वसामान्यांशी संवाद साधला.
आगामी विधानसभा निवडणुकीत तेच तेच चेहरे नकोत, असा विनंतीवजा प्रश्न एका प्रेक्षकाने पवार यांना विचारला. त्यावर विधानसभेला तुम्हाला दिसेल, भाकरी फिरवलेली असेल, असं पवार म्हणाले.
यंदाच्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्ष तरूण कार्यकर्त्यांना सर्वाधिक संधी देणार असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत. पक्षातल्या लोकांशी याबाबत बोलणं झालेलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, शरद पवार यांनी आज फेसबुक लाईव्ह करून विविध मुद्द्यांवर पक्षातल्या कार्यकर्त्यांशी आणि सर्वसामान्य लोकांशी संवाद साधला.
महत्वाच्या बातम्या
-चंद्रकांत खैरेंचे हर्षवर्धन जाधवांवर खळबळजनक आरोप
-उद्धव यांचा दुष्काळ दौरा… त्यात विकासकामाचे उद्घाटन अन् उत्साही कार्यकर्त्यांनी फोडले फटाके
दुष्काळ कितीही गंभीर असला तरी शिवसेना तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिल- उद्धव ठाकरे
-ममतांचा उलटा प्रवास सुरू; आता जनताच त्यांचं श्राद्ध घालेल- गिरिराज सिंह
-औरंगाबादचा पराभव हा फक्त चंद्रकांत खैरेंचा नाही तर तो माझासुद्धा आहे- उद्धव ठाकरे
Comments are closed.