पुणे महाराष्ट्र

तीन-चार रुपयांमध्ये हॉटेलात कपभर चहा तरी मिळतो का? -शरद पवार

पुणे | शेतकऱ्याच्या एका कुटुंबात सर्वसाधारणपणे 5 व्यक्ती असतात, केंद्राच्या 6 हजारांचा विचार केल्यास एका व्यक्तीच्या वाट्याला 3 ते 4 रुपये येतात. 3 ते 4 रुपयांत हॉटेलात कपभर चहा तरी मिळतो का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारला विचारला आहे. ते माळेगाव येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

शेतकऱ्यांच्या शेतमालाला त्यांच्या घामाचा दाम दिला गेला पाहिजे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

आमच्या सरकारच्या काळातही आत्महत्या होत होत्या मात्र आम्ही 71 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला, असं शरद पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, केंद्र सरकारनं अर्थसंकल्प जाहीर करताना अल्पभूधारक शेतकऱ्यांना 6 हजार रुपये वार्षिक अनुदान देण्याची घोषणा केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

“अण्णा तुम्ही सत्ताधारी नालायकांसाठी जीवाची बाजी लावू नका”

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फेसबुकवरून जीवे मारण्याची धमकी

आयसीसी म्हणतंय, स्टंपच्या मागे धोनी असताना क्रिज सोडायचं नसतं!

-“या देशात ‘एक’ पंतप्रधान होते पण ते मुके होते”

पंतप्रधान मोदींविरोधात राज ठाकरेंचा ममता बॅनर्जींंना पाठिंबा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या