जळगाव | कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणाची माहिती लपवण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे, असा पुनरुच्चार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. रविवारी जळगाव दौऱ्यावर असताना झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर सावध प्रतिक्रिया दिली आहे.
कायद्यामध्ये केंद्र सरकारला एखाद्या प्रकरणाची चौकशी करण्याचा अधिकार आहे, हे मान्य आहे. पण राज्याची संमती घेण्याची पद्धत आहे. राज्य सरकारला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. हा प्रकार घडला तेव्हा फडणवीस सरकार होतं. त्यामुळे या घटनेत काहीतरी लपवण्यासारखं असेल, म्हणूनच केंद्राने हा तपास एनआयएकडे दिला असल्याचा गंभीर आरोप शरद पवारांनी यावेळी बोलताना केला.
एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा हे विषय वेगवेगळे आहेत. केंद्र सरकारने हा तपास एनआयएकडे देणं म्हणजे त्यांना काही गोष्टी लपवाच्या झाकायच्या आहेत. सत्य बाहेर येण्याची भीती तत्कालीन सरकारला असावी. दिल्लीच्या सरकारने मदतीला येत हे प्रकरण काढून घेतलं. हे योग्य नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, एकंदर परिस्थिताला चुकीचा अर्थ लावून ज्यांचा संबंध नाही त्यांंनी फक्त लिखाण केलं म्हणून आत टाकणं, त्यांच्यावर खटले भरणं, वर्ष-वर्ष त्यांच्यावर देशद्रोसारखे गुन्हा दाखल करणं योग्य नाही, याची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणीही शरद पवारांनी यावेळी केली आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
शरद पवारांची ‘ती’ मागणी वाढणार मुख्यमंत्री ठाकरेंची डोकेदुखी?
पवार साहेबांना ओळखायला दहा जन्म घ्यावे लागतील- धनंजय मुंडे
महत्वाच्या बातम्या-
अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान!
खेड-शिवापूर टोलनाक्याविरोधात आंदोलन; पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीच्या मार्गात बदल
“परदेशी कन्येपासून झालेला राहुल गांधींचा जन्म देशासाठी मोठी चूक”
Comments are closed.