Top News

शरद पवारांकडून मोठा गौप्यस्फोट; मुख्यमंत्र्यांवर केले ‘हे’ गंभीर आरोप

पुणे | मुख्यमंत्री स्वत: आमच्या आमदारांना भाजपमध्ये येण्यासाठी फोन करत आहेत, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.

राष्ट्रवादीतून सुरू असलेल्या आऊटगोईंगच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर फोडाफोडीचं राजकारण सुरू असून विरोधी पक्षातील आमदारांना ईडीद्वारे धमकावलं जात आहे, असे गंभीर आरोप पवारांनी केले आहेत.

फोडाफोडीसाठी शिवसेना-भाजपकडून अनेक सहकारी संस्थांसह बँकांचाही गैरवापर केला जातोय, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

अल्पवयीन मुलीसोबत सहमतीनं शारीरिक संबंध ठेवल्यास तो गुन्हाच; न्यायालयाचा निर्णय

-पती पत्नीने जिद्दीने एकत्र अभ्यास केला अन् राज्यसेवा परिक्षेत मिळवला पहिला, दुसरा क्रमांक

-चालू परिस्थितीला कसं उत्तर द्यायचं ते आम्हाला ठाऊक आहे- शरद पवार

-“प्रकाश आंबेडकर हेच वंचितचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार!”

-प्रमुख मार्गदर्शक असलेल्या शरद पवारांची ‘या’ पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्याकडे पाठ!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या