बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवारांचा राज्यसभेसाठी अर्ज दाखल; मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेतेही उपस्थित

मुंबई| राज्यसभेसाठी शरद पवार यांनी आज अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच काँग्रेसचे अन्य जेष्ठ नेतेही उपस्थित होते.

जरी शरद पवारांनी राज्यसभेसाठी अर्ज भरला असला तरी महाविकास आघाडीमध्ये चौथ्या जागेसाठी असलेला तिढा अजूनही सुटलेला नाही. राष्ट्रवादीकडून आज शरद पवार आणि फौजिया खान अर्ज दाखल करतील, असं सांगण्यात येत होतं. पण चौथ्या जागेसाठी काँग्रेस आग्रही असल्यामुळे राष्ट्रवादीकडून आज शरद पवारांचाच अर्ज भरण्यात आला.

महाराष्ट्रातून राज्यसभेवर सात उमेदवार जाणार आहेत. यासाठी 13 मार्च रोजी निवडणूका होणार आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि भाजपने मात्र त्यांच्या नावाची यादी अजून जाहीर केलेली नाही.

विधानसभेतल्या सध्याच्या संख्याबळानुसार राज्यसभेवर 7 पैकी महाविकासआघाडीचे 4 तर भाजपचे 3 उमेदवार निवडून जाऊ शकतात. या 7 पेक्षा एखाद्या उमेदवाराने अर्ज भरला तर मात्र राज्यसभेसाठी निवडणूक होऊ शकते. जर सातच अर्ज दाखल झाले, तर मात्र राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होईल.

ट्रेंडींग बातम्या-

#Corona | कोरोना व्हायरसचा पहिला बळी

अबब! कोरोनाचा चिंचवडमध्ये शिरकाव… आढळली एक संशयित महिला

महत्वाच्या बातम्या-

“कोरोना आला तर हजारोंनी मास्क घेतले… अपघाताने रोज 600 मरतात तरी हेल्मेट का घेत नाही”

काँग्रेसमध्ये संधी नाही म्हणणाऱ्या ज्योतिरादित्य यांचा शरद पवारांनी घेतला समाचार; म्हणतात…

काँग्रेस सोडताना माझं मन अतिशय दु:खी आहे- ज्योतिरादित्य सिंधिया

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More