बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपला मोठा झटका?; ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता

मुंबई | बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बेळगाव दौऱ्यावर होते. शरद पवारांच्या बेळगाव दौऱ्यानंतर भाजपचे माजी खासदार राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

बेळगावमधील कित्तूरमध्ये चेन्नाम्मा यांच्या पुतळ्याचं अनावरण शरद पवारांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलताना शरद पवारांनी राणी चेन्नाम्मा यांनी इंग्रजांविरूद्ध संघर्ष केला होता. चेन्नाम्मा यांच्या त्यागामुळे येणाऱ्या पिढ्यांना विशेषत: महिलांना प्रेरणा मिळेल, असं म्हटलं आहे.

भाजपचे माजी खासदार प्रभाकर कोरे यांनी शरद पवारांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं होतं. प्रभाकर कोरे हे राज्यसभेचे खासदार होते. प्रभाकर कोरे हे लिंगायत समाजाचे देखील नेते आहेत. मात्र, कोरे हे गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. यामुळे प्रभाकर कोरे हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भाजप आमदार अभय पाटील यांनी प्रभाकर कोरे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर स्पष्टीकरण दिलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे सदर कार्यक्रम हा लिंगायत समाजाचा होता. तो कार्यक्रम भाजपचा नव्हता. प्रभाकर कोरे आणि शरद पवार यांचे चांगले संबंध आहेत, असं अभय पाटील यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

Gold Rate: सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांनी वाढ, वाचा ताजे दर

सोनाली कुलकर्णी पुन्हा अडकली लग्नबंधनात, फोटो शेअर करत म्हणाली…

उत्तर कोरियात दोन वर्षांनी कोरोना रूग्ण आढळताच किम जोंगने उचललं ‘हे’ मोठं पाऊल

मोठी बातमी! संभाजीराजेंकडून ‘स्वराज्य’ संघटनेची घोषणा

“माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जा”; राष्ट्रवादीचा भाजपला इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More