Top News मुंबई

शरद पवारांचं गृहमंत्र्यांना पत्र; पोलिसांसाठी केली ‘ही’ मागणी

मुंबई | राज्याच्या पोलीस खात्यावरचा अधिक भार लक्षात घेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पोलीसांसाठी राज्याच्या गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. बंदोबस्तावेळी महिला पोलीस, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेत त्यांनी पत्राद्वारे पोलिसांची व्यथा मांडली आहे.

सभेच्या बंदोबस्तावेळी पोलीस कर्मचारी-अधिकारी यांनी तत्पर व सज्ज असावयास हवं. मात्र सभा सुरळीत सुरू असताना विशेषत: महिला पोलीस कर्मचाऱ्यांना निष्कारण त्रास सहन करावा लागतो, असं मला वाटत असल्याचं शरद पवार यांनी पत्रात म्हटलं आहे.

सभा शांततेत सुरू असताना महिला पोलीस कर्मचारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार बसण्यासाठी खुर्ची अथवा आसन उपलब्ध करून देण्याविषयक संयोजकांना मार्गदर्शक सूचना निर्गमित व्हाव्यात. गृहमंत्री या बाबीकडे वैयक्तिक रीतीने लक्ष देतील, अशी मला अपेक्षा असल्याचंही पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शरद पवारांनी लिहिलेल्या पत्राच्या मागणीवर गृहमंत्री अनिल देशमुख काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

सिलेंडर घेऊन बसलेल्या स्मृती इराणींचा फोटो ट्विट करत राहुल गांधी म्हणाले…

पुण्यात थांबून राज ठाकरेंनी घेतला ‘या’ व्यक्तीचा सल्ला!

महत्वाच्या बातम्या-

आमदार सुनील टिंगरेंच्या नावानं मागितली जातेय खंडणी; टिंगरे, म्हणे तो मी नव्हेच!

कोणी जेलमध्ये टाकायची भाषा केली तर पवार साहेबांना आठवा- रोहित पवार

शिवरायांचा पुतळा हटवला तिथंच आता स्मारक; मुख्यमंत्री कमलनाथ करणार भूमिपूजन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या