बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट; दोन्ही नेत्यांमध्ये तासभर खलबतं

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी भेट झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री आणि शरद पवार भेटीत राज्यातील विविध विषयांवर चर्चा झाल्याचं समोर येत आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न, राज्यातील पूरपरिस्थिती आणि कोरोना स्थिती या विषयावर गंभीर चर्चा झाली आहे. तर त्यावेळी शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेच्या वतिने 2 कोटी 36 लाख 84 हजार 757 रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीत देण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यापूर्वी काल शरद पवार यांनी राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक घेतली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ही बैठक पार पडली. यात राष्ट्रवादी मंत्री, आमदार आणि राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांनी देखील हजेरी लावली होती. त्यावेळी शरद पवारांनी मतदारसंघाचा आढावा घेतला होता.

दरम्यान, काल झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत काही वाद शरद पवारांसमोर मांडले गेल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत हा मुद्दा देखील शरद पवारांनी मांडल्याचं समोर येतंय.

थोडक्यात बातम्या-

चीनची तालिबानला मोठी आर्थिक मदत; मदतीच्या रकमेचा आकडा वाचून थक्क व्हाल

सिद्धार्थ सोबतच्या आठवणी सांगताना विद्युत जामवालला अश्रू अनावर, पाहा व्हिडीओ

मोठी बातमी! महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ यांना मोठा दिलासा

लसीकरणात महाराष्ट्राचा नवा विक्रम, एकाच दिवशी ‘इतक्या’ लाख लोकांचं लसीकरण

सामन्यादरम्यान प्रतिस्पर्धकानं मान मोडली, पैलवानाचा रिंगणातच मृत्यू

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More