कमळीची काळजी करु नका, सुप्रिया बिनविरोध येईल- बाळासाहेब ठाकरे

पुणे | बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर व्यासपीठावर माझा काय उल्लेख केला यावर बोलणे नको, मात्र त्यांनी व्यक्तीगत सलोखा कधीच सोडला नाही, असे गौरवोद्गार शरद पवार यांनी बाळासाहेबांबद्दल काढले. राज ठाकरेंनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. 

सुप्रियाला राज्यसभेची उमेदवारी द्यायचे ठरले तेव्हा बाळासाहेबांनी मला फोन केला. मी त्यांची भूमिका विचारली.

बाळासाहेब म्हणाले, “आमची मुलगी निवडणूक लढविणार असताना माझी वेगळी भूमिका काय असेल.”

मी त्यावेळी त्यांच्या मित्रपक्षाच्या भूमिकेबद्दल विचारलं. तेव्हा ते म्हणाले, “तुम्ही कमळीची काळजी करु नका. सुप्रिया बिनविरोध निवडून येईल आणि खरोखरच सुप्रिया बिनविरोध निवडून आली”, असं शरद पवार यांनी सांगितलं.