देश

मोदी सरकारने गांधी कुटुंबाची एसपीजी सुरक्षा काढल्याने शरद पवार संतापले; म्हणतात…

मुंबई |  नरेंद्र मोदी सरकारने आज सोनिया गांधी,राहुल गांधी, आणि प्रियंका गांधी या तिघांचीही एसपीजी सुरक्षा काढून घेतली आहे. इथून पुढे या तिघांना केवळ झेड प्लस सिक्युरिटी असणार आहे. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी  गांधी कुटुंबातील सदस्यांना देण्यात आलेली एसपीजी सुरक्षा कवच मागे घेण्याचा एनडीए सरकारचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे, असं म्हटलं आहे.

गांधी कुटुंबाच्या सुरक्षेचे पैलू बिघडवण्याचा आणि राष्ट्रासाठी त्यांच्या बलिदानाकडे दुर्लक्ष करण्याचा केंद्र सरकारचा मुद्दाम प्रयत्न आहे, असा आरोप त्यांनी केंद्र सरकारवर केला आहे.

गांधी कुटुंबाला आता एसपीजीऐवजी झेड प्लस सुरक्षा देण्यात येणार आहे. या सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएप कमांडोंकडे असणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. याआधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचीही एसपीजी सुरक्षा हटवून त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या 4 व्यक्तींनाच भारतात एसपीजी सुरक्षा आहे. मात्र गांधी कुटुंबाची एसपीजी सुरक्षा काढून घेतल्याने आता यापुढे मोदींनाच एसपीजी सुरक्षा असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या