बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

या देशाची अर्थव्यवस्था वाचवायला मनमोहन सिंगांसारख्या व्यक्तीची गरज- शरद पवार

मुंबई | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना दीर्घ मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी महाराष्ट्र, देश तसंच आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर भाष्य केलं आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी बोलताना कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर फार मोठं संकट आलेलं आहे. हे संकट दूर करण्यासाठी आणि अर्थव्यवस्था सावरण्यासाठी आपल्याला मनमोहन सिंग यांच्यासारख्या तज्ज्ञ व्यक्तीची आवश्यकता असल्याचं रोखठोक मत पवार यांनी व्यक्त केलं.

भारताची अर्थव्यवस्था सावरायला एका मनमोहन सिंगांची गरज आहे का? असा प्रश्न संजय राऊत यांनी पवारांना विचारला, त्यावर बोलताना पवार म्हणाले, “100 टक्के गरज आहे. कारण मनमोहन सिंग अर्थमंत्री झाले तेव्हा त्या मंत्रिमंडळात मी होतो. मला माहितीये की त्यावेळेसा फायन्सान्सिंग क्रायसेसमधून आम्ही कसे जात होतो. पण अशा काळात देखील मनमोहन सिंग यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला एक नवी दिशा दिली.”

“आजच्या कोरोनाच्या परिस्थितीत देखील अर्थव्यवस्था सावरायला मनमोहन सिंग यांच्यासारख्या माणसाची गरज होती. तश्या प्रकारच्या तज्ञ्ज लोकांची मदत घेऊन मोदी साहेबांनी पावलं टाकायला हवी होती. माझी खात्री आहे की अश्या प्रकारच्या कोणत्याही प्रयत्नांना देश सहकार्य करेल”

“अश्या जागतिक संकटाच्या काळात देशाच्या प्रमुखांनी इतर पक्षाच्या काही जाणकार लोकांशी बोलण्याची गरज आहे. संकटाची व्याप्ती पाहता कुठल्या तरी एकाच पक्षाने आपण हे सर्व सोडवून टाकू ही भूमिका घेऊन चालणं योग्य नसल्याचं” सांगत पवार यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका केली.

शरद पवार मुलाखत स्पेशल बातम्या-

केंद्राने आपलं दुकान चालवण्यासाठी….., शरद पवार यांचं रोखठोक मत

मुख्यमंत्र्यांच्या पाठीवर शरद पवारांकडून कौतुकाची थाप, म्हणाले, आमचा विद्यार्थी पास झालाय!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More