Top News महाराष्ट्र मुंबई राजकारण

“शिवसेना-भाजपमध्ये अंतर वाढावं म्हणून जाणीवपूर्वक मी ‘ते’ काम केलं”

मुंबई |  संजय राऊत यांनी दावा केल्याप्रमाणे शरद पवार यांनी मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट करून राजकीय वर्तुळात खळबळ माजवून दिली आहे. तिसऱ्या आणि अखेरच्या भागात बोलताना पवारांनी शिवसेना आणि भाजपमधला संसार कसा तुटेल,  याची कशा पद्धतीने रणनिती आखली होती, याचं गुपित स्पष्ट केलं.

2014 चा विधानसभा निवडणुकीत सगळे पक्ष स्वतंत्र लढले होते. नंतर निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये कुणालाही बहुमत मिळालं नव्हतं. मग ज्यावेळी मला शिवसेना आणि भाजप एकत्र येईल असं दिसलं त्यावेळी मी मुद्दामहून शिवसेना आणि भाजपत अंतर वाढावं म्हणून पाठिंबा पाठिंबा देण्याचं घोषित केलं, असं पवार यांनी सांगितलं.

शिवसेनेने भाजपशी कायमचा संसार का थाटू नये याचं कारणही पवारांनी सांगितलं. पवार म्हणाले, भाजपच्या हाताने सरकार चालवू देणं हे शिवसेनेच्या हिताचे नाही. कारण दिल्लीची सत्ता त्यांच्या हातात होती. परत राज्याची सत्ता म्हणजे मुख्यमंत्री त्यांच्या हातात. यामुळे शिवसेना किंवा अन्य पक्षांना लोकशाहीमध्ये त्यांच्या पक्षांच काम करण्याचा अधिकार आहे हेच त्यांना मुळात मान्य नाही. आणि त्यामुळेच आज ना उद्या या सर्वांना निश्चितपणे धोका देणार आहेत म्हणून आमची ती एक राजकीय चाल होती.

दरम्यान, या मुलाखतीत ठाकरे सरकार पाच वर्ष चालेल. या सरकारला कोणताही धोका नाही, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी उत्तम संवाद ठेवला तर कोणतंही ऑपरेशन महाराष्ट्रात शक्य होणार नाही, असं म्हणत त्यांनी ऑपरेशन लोटसची शक्यता धुडकावून लावली.

महत्त्वाच्या बातम्या-

शरद पवारांच्या ‘या’ दाव्याने राजकारणात खळबळ, भाजपला हादरा!

…म्हणून मी 2014 ला भाजपला पाठिंबा देतो असं म्हटलं, ते ‘टॉप सिक्रेट’ पवारांनी अखेर सांगितलं !

….तर महाराष्ट्रात कोणतंही ऑपरेशन फोल ठरेल, शरद पवारांचं भाजपला ओपन चॅलेंज

महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होईल का?, शरद पवारांचं ‘पॉवरफुल्ल’ उत्तर!

प्रियांका गांधींचं घर काढून घेणं हा सत्तेचा दर्प आणि क्षुद्रपणा, शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या