महाराष्ट्र सातारा

शरद पवार आज सातारा दौऱ्यावर, जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार

सातारा |  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत. सातारा शहर तसंच जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आणि उपाययोजनांचा ते आढावा घेणार आहेत. त्यांच्या सोबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील आहेत.

सकाळी साडे दहाच्या सुमारास शरद पवार यांचं साताऱ्यात आगमन झालं आहे. सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रमुख शासकिय अधिकारी यांच्याकडून ते सातारा जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या वाढते आहे. तसंच रूग्णांची हेळसांड होत असल्याच्या तक्रारी वरवर वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर ते आज साताऱ्यात येऊन लोकप्रतिनिधी तसंच अधिकाऱ्यांकडून उपाययोजनांचा आढावा घेतील तसंच काही महत्त्वाच्या सूचना करतील.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी वाढत्या कोरोना रू्णांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहराचा दौरा केला होता. त्या वेळी देखील त्यांच्यासोबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते.

‘या’ महिन्यापर्यंत फेसबुक कर्मचारी करू शकतात घरून काम, कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण!

देशात कोरोनाने रेकॉर्ड मोडला, काल एकाच दिवसात मिळाले तब्बल एवढे हजार रूग्ण

दुकान कामगार, भाजीविक्रेते यांच्याही कोरोना चाचण्या करा; केंद्र सरकारचे निर्देश

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या