भाजप सरकार संविधानविरोधी आहे- शरद पवार

कोकण | संविधान बदलणे हा भाजपचा अजेंडा आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. रोहा येथील राष्ट्रवादीच्या ‘संविधान बचाव, देश बचाव’ कार्यक्रमात ते बोलत होते. 

ज्यांच्या हातात देशाची सूत्रे आहेत, त्यांचा संविधानावर विश्वास नाही. संधी मिळेल तेव्हा संविधानाचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं. 

भाजप सरकार संविधानविरोधी आहे. संविधान बदलणे हा त्यांचा मूळ अजेंडा असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं. 

दरम्यान, देशाच्या संविधानावरची ही आक्रमणे थोपवली गेली पाहिजेत, असं आवाहन शरद पवार यांनी केलं.

महत्वाच्या बातम्या-

-राज ठाकरे माझी कॉपी करत आहेत- प्रकाश आंबेडकर

-‘साताऱ्यात फक्त उदयनराजेच चालतात’; उदयनराजेंच्या समर्थकांची तोडफोड

-मला असली घाणेरडी गोष्ट करायची नाही; राखी सावंतनं लग्न मोडलं!

-‘जीवनातून बाहेर पडण्यासाठी इथं कापा’ असं लिहून विद्यार्थीनीची आत्महत्या

-कुमार केतकरांनी मोदींवर केलेल्या आरोपाच्या भूमिकेशी मी सहमत- शरद पवार