बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शरद पवार बोलतात त्याच्या नेहमी उलट होतं, त्यामुळे…”

मुंबई | राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनी मोठं वक्तव्य केलं. शिंदे सरकार पाच-सहा महिने टिकेल, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं. तर शरद पवारांचं हे भाकीत खर असून गुजरातमध्येही मध्यावती निवडणुका लागणार असल्याचं भाकीत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं.

शरद पवार व संजय राऊतांच्या या वक्तव्यावर आता प्रवीण दरेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवारांनी आतापर्यंत अनेक भाकीतं केली आहेत. शरद पवार बोलतात त्यांच्या नेहमी उलट होतं. त्यामुळे आता भाजपचं सरकार येणारे काही दशके असेल, असं वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी बोलताना केलं. तर शरद पवार व संजय राऊतांचं भाकीत दरेकरांनी फेटाळून लावलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-भाजपचे सरकार उदयास येईल, असा विश्वास देखील दरेकरांनी बहुमत चाचणीपूर्वी व्यक्त केला होता.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात अनेक अनपेक्षित अश्या घटना घडत आहेत. आजच्या विश्वासदर्शक आणि बहुमत चाचणी प्रस्तावात महाविकास आघाडी सरकारला 99 मते मिळाली तर शिंदे गट भाजपला 164 मतं मिळाली. तर 3 आमदारांनी तटस्थ भुमिका घेतली. शिंदे सरकारने बहुमतापेक्षा जास्त मतं मिळवत विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे.

थोडक्यात बातम्या

अमरावती हत्याकांडानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मोठी बातमी ! बहुमत चाचणीपूर्वी शिवसेनेला आणखी एक झटका

‘घटनेचे रखवालदार म्हणवून घेणारेच असे दुटप्पीपणे वागत असतील तर…’, शिवसेनेचा घणाघात

मोठी बातमी! शिवसेनेला आणखी एक धक्का, शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदेच

शरद पवारांचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More