बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…म्हणून शरद पवारांनी राष्ट्रपती होऊ नये”

मुंबई | राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलैला संपणार आहे. त्यामुळे राष्ट्रपतीपदासाठी निडणूक जाहीर झाली असून विरोधकांमध्ये संयुक्त उमेदवार करण्याबाबत हालचालींना वेग आला आहे.

राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नावाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरूये. त्याचप्रमाणे शरद पवार (Sharad Pawar) यांना बऱ्याच पक्षाचा पाठिंबा देखील आहे. जर महाराष्ट्राचा व्यक्ती देशाचा राष्ट्रपती होत असेल आणि शरद पवार यांचं नाव पुढे आलं तर महाराष्ट्र काँग्रेस त्यांच्याबरोबर आहे. अशा चर्चा सर्वत्र रंगल्या आहेत. पण अशा चर्चांना वाव मिळत असतान राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडीतील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचं वेगळ मत मांडलं आहे. शरद पवार यांना राष्ट्रपती करु नये, असं जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलंय. शिवाय शरद पवारांनी राष्ट्रपती का होऊ नये याचं कारण देखील त्यांनी सांगितलं आहे.

जरी राष्ट्रपदीपदासाठी निवडणूक जाहीर झाल्या असल्या तरी देखील संख्याबळ लक्षात घेऊन निर्णय घेतला पाहिजे. शरद पवार आज सुद्धा ग्रामीण भागात लोकांशी संवाद साधत फिरत असतात हे बघून मला असा वाटत आहे की, त्यांनी अशाच पद्धतीचं काम करावं. उद्या जर ते राष्ट्रपती झाले तर त्यांच्यामुळे महाराष्ट्राचा सन्मान होईल पण मात्र शरद पवार जोपर्यंत लोकांमध्ये मिसळत नाही तोपर्यंत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत नाही. म्हणून मला असं वाटतं की, त्यांनी लोकांमध्येच रहावं, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.

पुढे ते असं देखील म्हणाले की, विरोधी पक्षातील सक्षम चेहरा म्हणून शरद पवारांचं नाव घेतलं जात आहे. पण विरोधी पक्षांना खरंच तसं वाटत असेल तर पवार यांना राष्ट्रपती करण्यापेक्षा त्यांना UPA चे प्रमुख नेते म्हणून जाहीर करावं आणि येणाऱ्या 2024 ची रणनीतीची तयारी त्यांनी सुरु करावी. शरद पवार यांना मंत्री करा असं मी अजिबात म्हणत नाही पण जर आता पासूनच 2024 च्या निवडणुकीची तयारी केली तर पुढे त्यांना ते अवघड जाणार नाही.

थोडक्यात बातम्या-

पंतप्रधान नरेंद्र मोदी खऱ्या अर्थाने वारकरी आहेत- देवेंद्र फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा; भारतात 10 लाख नोकऱ्या देणार

राज ठाकरे यांच्या 54 व्या वाढदिवसानिमित्त ‘या’ शहरात मिळतंय 54 रुपयांत एक लिटर पेट्रोल

SBI च्या ग्राहकांसाठी गुड न्यूज; बँकेने घेतला मोठा निर्णय

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More