मुंबई | कोरोनाला हरवायचं असेल तर सगळ्यांना घरात बसणं कर्मप्राप्त आहे. शासनाने घालून दिलेले नियम पाळणं खूप गरजेचं बनलंय. मात्र अशाही परिस्थितीत काही लोकांना घटनेचं गांभीर्य नाहीये. कायदा मोडून ते घराबाहेर पडत आहेत. जनतेने घरात थांबावं यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आगळावेगळा संदेश दिला आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग करताना घरातच बसण्याची वेळ आल्यावर लोक विचारतात तुम्ही काय करता आहात?
मी सांगतो… घरी पुस्तक वाचत आहे, असं ट्विट करत शरद पवार यांनी जनतेला घरात बसण्याचा आवाहन केलं आहे. तसंच त्यांनी आपल्या ट्विटमध्ये ते पुस्तक वाचत असल्याचा फोटोही ट्विट केला आहे.
शरद पवार यांचं पुस्तक प्रेम सर्वांना परिचित आहे. कोरोनाच्या या कठीण काळात त्यांनी कुटुंबाबरोबर राहत आणि सोशल डिस्टसिंग पाळत पुस्तक हा माणसाचा चांगला मित्र आहे असं म्हणत घरात बसून पुस्तक वाचण्याचं पसंत केलं आहे. यामधून त्यांनी राज्यातील जनतेला एक आगळावेगळा संदेश दिला आहे.
दरम्यान, रविवारी पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी संध्याकाळी 5 वाजता अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या सर्वांचं घराबाहेर येऊन टाळ्या वाजवून अभिनंदन केलं. यावेळी त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी प्रतिभा पवार, मुलगी खा. सुप्रिया सुळे, जावई सदानंद सुळे तसंच नात रेवती सुळे आणि नातू देखील उपस्थित होता.
ट्रेंडिंग बातम्या-
“पाकिस्तानमध्ये आम्ही लॉकडाउन करु शकत नाही”
महत्वाच्या बातम्या-
लालबाग गणेश मंडळाचं ‘एक पाऊल पुढे’; रक्तदान शिबिराचं आयोजन
जमावबंदीचे आदेश झुगारुन वाहनांच्या रांगा; यांना नक्की जायचंय कुठं???
घराबाहेर पडणार असाल तर सावधान! पुणे पोलिसांनी घेतलाय ‘हा’ मोठा निर्णय
Comments are closed.