महाराष्ट्र मुंबई

“गुप्तचर यंत्रणेने माहिती देऊनही गृहखात्याने दखल घेतली नाही”

मुंबई | शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चाची व्याप्ती केंद्र सरकारच्या लक्षात यायला हवी होती. मात्र गुप्तचर यंत्रणांच्या माहितीची योग्यप्रकारे दखल घेतली नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधलाय.

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

सगळ्यांनाच हा ट्रॅक्टर मोर्चा किती मोठा असेल, याची जाणीव होती. इतक्या मोठ्याप्रमाणावर अराजकीय घटक एकत्र आले तर उद्रेक होण्याची शक्यता आहे, हे गृहमंत्रालयाला लक्षात यायला पाहिजे होतं, असं शरद पवार म्हणाले.

नवी दिल्लीत जे घडतंय त्याला समर्थन नाही. पण ते का घडतंय? याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. शांततेने आंदोलन करणारा शेतकरी संतप्त का होतो याची जबाबदारी घ्यायला हवी होती, असं शरद पवारांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

‘आता मला लाज वाटायला लागली आहे’; प्रवीण दरेकरांना शरद पवारांचा सणसणीत टोला

“आता भाजपवाले शरद पवार, उद्धव ठाकरे आणि जो बायडन यांचा राजीनामा मागणार का?”

केंद्र सरकारने शहाणपणा दाखवावा, कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नये- शरद पवार

आंदोलन करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना जेलमध्ये टाका- कंगणा राणावत

“राजपथावर सामर्थ्य दिसत होतं, आज शरम दिसली”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या