बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवार-सुप्रिया सुळे यांचा मुंबईत फेरफटका, पाहा शरद पवारांचा लाईव्ह व्हिडीओ

मुंबई | शस्त्रक्रिया झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नुकतेच घरी आले आहेत. रुग्णालयातून घरी आल्यानंतर शरद पवारांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत गाडीतून मुंबईत फेरफटका मारला.

सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाईव्ह करुन शरद पवारांशी संवाद साधला. यावेळी दोघांनी अनेक विषयांवर गाडीत गप्पा मारल्या. या फेसबुक लाईव्ह दरम्यान सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांना अनेक प्रश्नही विचारले.

नमस्कार रितसर परवानगी घेऊन बाहेर पडलोय. लॉकडाऊन आहे याची जाणीव आहे, जबाबदारी आहे. मी आणि बाबा चेंज म्हणून ड्राईव्हला आलो, असं सुप्रिया सुळेंनी यावेळी सांगितलं. तसेच यावेळी मुंबई किती बदलली आहे, असंही त्या म्हणाल्या. शरद पवार मुंबईत कधी आले, कुठे राहिले,  शरद पवारांनी पूर्वीची जुनी मुंबई कशी होती हे सर्व या फेसबुक लाईव्ह दरम्यान सांगितलं.

मी 1962-63 मध्ये काँग्रेसचे युवक सेक्रेटरी म्हणून आलो त्यावेळी दादरला खेड गल्ली होती. तिथे सगळे मिल वर्कर होते. पुणे जिल्ह्यातील लोक जास्त होते. आता त्याचं नाव काकासाहेब गाडगीळ लेन असं आहे. आता तिथे काँग्रेसचं टिळक भवन आहे. तिथे आम्ही राहायचो. आम्ही तिथे 5 वर्ष टिळक भवनमध्ये राहिलो मी काँग्रेस नेते असे बरेच होतो. आता बदललंय सगळं, असं शरद पवारांनी सांगितलं.

 

थोडक्यात बातम्या- 

डॅडी अरूण गवळी झाला आजोबा; गवळी-वाघमारे कुटुंबात नव्या पाहुणीचं आगमन

दिलासादायक! पुण्यात कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत घट, जाणुन घ्या आजची आकडेवारी

‘कोरोना लस निर्यातीत भारताने दाखवलेली उदारता विसरणार नाही’; ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी मानले आभार

महाविकास आघाडीत बिघाडी?! काँग्रेसच्या ‘या’ आमदाराने अनिल परबांवर केले गंभीर आरोप, पाहा व्हिडीओ

आपला कोरोनाशी लढा, पंतप्रधानांशी नाही, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More