बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जनसामान्यांचं निस्सीम प्रेम लाभलेला स्वच्छ प्रतिमेचा, ध्येयवादी नेता गमावला”

मुंबई | शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन झालं आहे. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गणपतराव देशमुख यांच्या निधनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शोक व्यक्त केला आहे.

कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि उपेक्षितांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे गणपतराव देशमुख यांच्या निधनाचं वृत्त दुःखद आणि क्लेशदायक आहे. महाराष्ट्राच्या चार पिढ्यांच्या मतदारांशी घट्ट नाळ जुळलेला गणपतरावांसारखा लोकप्रतिनिधी खरंच विरळा म्हणावा लागेल, असं शरद पवार म्हणाले.

लोकाभिमुख राजकारणाची कास धरत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून 1 वेळा निवडून येण्याची किमया गणपतरावांनी साधली. त्यांच्या निधनामुळे जनसामान्यांचे आणि कार्यकर्त्यांचे निस्सीम प्रेम लाभलेला स्वच्छ प्रतिमेचा, ध्येयवादी नेता आज आपण गमावला आहे, अशा भावना शरद पवारांनी व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, राजकारणातील एक साधं आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपलं… आबासाहेबांनी राजकारणामध्ये एक आदर्श निर्माण केला, जो वर्षानुवर्षे एक मापदंड म्हणून राजकीय विश्वात राहील. गणपराव यांनी सर्वाधिक काळ आणि सातत्याने मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं. ज्या साध्या आणि उच्च विचारसरणीने त्यांनी त्यांचं जीवन व्यतीत केलं ते मला जास्त महत्वाचं वाटतं, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-

कोरोनानंतर नोरोव्हायरसचा धुमाकूळ; इंग्लडमध्ये अलर्ट जारी

पुण्यातील ‘फुकट बिर्याणी’ ऑर्डर प्रकरणात मोठा ट्विस्ट!

‘आपला लोकशाही देश आहे, त्यामुळे…’; न्यायालयानं शिल्पाला सुनावलं

तळियेनंतर ‘या’ 13 गावांना मोठा धोका; प्रशासन अॅक्शन मोडमध्ये

राजकारणातील एक साधं आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपलं- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More