बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्य 60व्या वर्षात पदार्पण करतंय अन् मी 80 व्या, या वयात आपण थांबायचं…- शरद पवार

मुंबई | राज्य 60व्या वर्षात पदार्पण करतंय आणि मी 80 व्या वर्षात पदार्पण करतोय. या वयात आपण थांबायचं. आता कसलं व्हिजन बघत बसायचं, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत. एबीपी माझ्याच्या ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ या विशेष कार्यक्रमात बोलत होते.

व्हिजन बघण्याचं काम आता युवा पिढीकडे द्यायचं आणि आपण त्यांच्याकडे पाहत राहायचं. अलिकडे मी तेच काम करतोय. हे काम मी त्यांच्याकडे सोपवून पाहत बसलो आहे. काही अडचण आली, विचारलं तर सांगायचं, असं म्हणत शरद पवारांनी राजकारणातल्या आणि समाजकारणातल्या नव्य भूमिकेचे संकेत दिल्याचं दिसतंय.

वयाच्या या टप्प्यावर व्हिजन सांगणं योग्य नाही. आता तरुणांना व्हिजन द्यायचं आणि ते काय करतात हे पाहायचं. त्यांच्या कामात हस्तक्षेप करायचा नाही, असंही शरद पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, तरुणांना व्हिजन देत त्यांचं काम पाहत बसतो. त्यांनी विचारलं तरंच सल्ला देतो. कारण न विचारता सल्ला देणं आणि कामात हस्तक्षेप करणं योग्य नसतं. यामुळे तुमचा मान राहत नाही, असंही शरद पवारांनी सांगितलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतून संभाजी महाराजांच्या हत्येचा भाग वगळणार”

“…तर सोनिया गांधी आणि राहुल गांधींचं नागरिकत्व रद्द होईल”

महत्वाच्या बातम्या-

वाघ आहे का बेडूक; मनसेची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

‘उद्धव ठाकरेंनी आधी CAA कायदा समजून घ्यावा’; काँग्रेस नेत्याचा सल्ला

“फडणवीस दिल्लीत जाऊन चांगलं काम करतील, त्यांना माझ्या शुभेच्छा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More