महाराष्ट्र मुंबई

मनसेची ‘ही’ भूमिका आग्रही; पण आम्हाला मान्य नाही- शरद पवार

मुंबई | ईव्हीएमविरूद्ध मनसेची भूमिका आग्रही आहे. परंतू निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यासंबंधीची मनसेची भूमिका फारशी पटलेली नाही, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

जर बॅलेटपेपरवर आगामी विधानसभा निवडणूक घेतली नाही तर निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा मनसेने दिला आहे. याच मुद्द्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे.

ईव्हीएमच्या मुद्द्यावर मी दिल्लीत अनेक लोकांशी बोललो आहे. अनेक पक्ष ईव्हीएमच्या विरूद्ध आहेत. ते सुद्धा आक्रमक आहेत. परंतू मनसेची बहिष्कारासंदर्भातील मागणी आम्हाला मान्य नाही, असं पवार म्हणाले आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे आघाडीत सामिल होणार अशा चर्चा आहेत. मात्र राज ठाकरेंशी अद्याप कुठलीही चर्चा झाली नाही, असं पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“पक्षाला तुमची गरज आहे…पक्ष सोडू नका; उदयनराजेंचं मी बघतो”

-‘त्या’ आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी आझम खान यांनी मागितली माफी!

-…तर अजित पवारांनीच सर्वात पहिला भाजपमध्ये प्रवेश करायला हवा होता!

-येडियुरप्पांनी कर्नाटकमध्ये अखेर कमळ फुलवलं; बहुमत परीक्षणात पास

-बिचुकले इज बॅक; ‘या’ दिवशी घेणार बिग बॉसच्या घरात एन्ट्री

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या