Top News महाराष्ट्र मुंबई

ज्यांचा हातात सत्ता आहे, त्यांना देशातील कष्टकऱ्यांबद्दल कवडीची आस्था नाही- शरद पवार

मुंबई | दिल्लीत गेल्या 60 दिवसांपासून शेतकरी कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करत आहेत. ही लढाई सोपी नाही. ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना देशातील कष्टकऱ्यांबद्दल कवडीची आस्था नाही, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.

अखिल भारतीय किसान सभेचा मोर्चा रविवारी रात्री मुंबईत दाखल झाला आहे. या मोर्चाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही पाठींबा दिला आहे. पवार मोर्चाच्या समर्थनार्थ आझाद मैदानात उतरले आहेत.

भाजपने चर्चा न करता मंजूर करण्यात आले. बोलू दिल नाही. केलेला कायदा मागे घ्या किंवा नका घेऊ पण देशातील जनता कायदा आणि तुम्हाला उद्ध्वस्त करणार हे नक्की, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, शेकापचे नेते जयंत पाटील, मंत्री जितेंद्र आव्हाड, सुनील केदार, भाकपचे नेते कॉम्रेड नरसय्या आडाम, मुंबई काँग्रेस प्रमुख भाई जगताप आणि अबू आझमी इ. नेते उपस्थित आहेत.

थोडक्यात बातम्या-

मोदींनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले, आंदोलनात राजकारण येऊ नये- पंकजा मुंडे

“राज्य सरकारातला एक मंत्री जिरवायची भाषा करतो हे योग्य नाही”

पॉर्न पाहात असला तर सावधान; पुढचे काही दिवस सतर्क राहा, नाहीतर…

निर्वस्त्र न करता छातीला स्पर्श करणे लैंगिक अत्याचार नव्हे; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

वडेट्टीवारांची वादग्रस्त वक्तव्ये अन् रोहित पवार म्हणतात, ओबीसींमध्ये अपप्रचार करणाऱ्याला शोधलं पाहिजे!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या