Top News महाराष्ट्र मुंबई

शेतकरी दिनी बळीराजाला आंदोलन करावं लागतंय हे दुर्दैव- शरद पवार

मुंबई |  आज राष्ट्रीय शेतकरी दिवस असून देशभरात हा दिवस साजरा होत आहे. मात्र केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असलेल्या बळीराजाला उचित सन्मान देण्याची प्राथमिक जबाबदारी शासनकर्त्यांची आहे. पण आज दुर्दैवाने देशाच्या शेतकऱ्याला त्याचे हक्क व मागण्यांसाठी आंदोलन करावं लागत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

देशाच्या बळीराजाला न्याय मिळावा हीच राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त सदिच्छा व्यक्त करतो, असंही शरद पवार म्हणाले. यासंदर्भात पवारांनी ट्विट केलं आहे. शरद पवार युपीए सरकारच्या काळात शरद पवारांनी केंद्रीय कृषीमंत्री होते.

दरम्यान, गेल्या 26 दिवसांपासून राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे. मात्र केंद्र सरकारमधील काही मंत्री हे आंदोलन शेतकऱ्यांचं नाही तर दलालांचं असल्याचं म्हणत आहेत. तर दुसरीकडे शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यामुळे आणखी किती दिवस बळीरीजाला कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत रहाव लागणार हे येत्या दिवसांमध्ये कळेलंच.

 

थोडक्यात बातम्या-

“काँग्रेसमध्ये कोणाला पद मिळालं तर तो बाद कसा होईल यासाठी मोठा गट तयार असतो”

भाजपाला टीकांचा ‘भारतरत्न’ द्यायला पाहिजे- संजय राऊत

“मी मुख्यमंत्री असतो तर बच्चू कडूंचा राजीनामा घेतला असता”

मुंबई पोलिसांच्या अटकेच्या कारवाईनंतर सुरेश रैनाची प्रतिक्रिया, म्हणाला…

शेतकऱ्यांच्या परिस्थितीला पंडित जवाहरलाल नेहरू जबाबदार- मुकेश खन्ना

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या