“…मग राणेंना अटक झाली तेव्हा त्यांचा राजीनामा का घेतला नाही?”
मुंबई | राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ताब्यात घेतलं. न्यायालयाने नवाब मलिकांना 7 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. नवाब मलिकांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मलिकांची पाठराखण केली आहे.
नवाब मलिकांना राजकीय हेतूने अटक करण्यात आली असल्याचं आमचं स्पष्ट मत आहे. नवाब मलिक गेल्या 20 वर्षांपासून महाराष्ट्राच्या विधानसभेत आहेत. त्या सर्व काळात त्यांचं हे चित्र कधी दिसलं नाही. हे आत्ताच दिसलं, अशी टीका शरद पवारांनी केली आहे.
मलिकांना म्हणतात की राजीनामा द्या, का तर त्यांना अटक झाली. मान्य आहे ही मागणी भाजपची आहे. आमचे जुने सहकारी नारायण राणे साहेब त्यांनाही अटक झाली होती. त्यानंतर त्यांना मंत्रिमंडळातून कमी करण्याचा निर्णय तुम्ही घेतला, हे आमच्या पाहण्यात नाही आलं, असा खोचक टोला शरद पवारांनी विरोधकांना लगावला आहे.
दरम्यान, नारायण राणेंना एक न्याय, नवाब मलिकांना दुसरा न्याय. म्हणजेच हे सर्व राजकिय हेतूने केलेला उद्योग आहे, असा घणाघात शरद पवारांनी केला आहे. तर एखादा मुस्लिम कार्यकर्ता असला की त्याला दाऊदचा जोडीदार धरायचं. कधीकाळी माझ्यावरही आरोप झाले होते, असंही शरद पवार म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ; जाणून घ्या पेट्रोल डिझेलचे आजचे भाव
मोठी बातमी! मायदेशी परतण्यासाठी नागरिकांना वाट मोकळी, रशियाने घेतला मोठा निर्णय
मेडिकल शिक्षण घेणाऱ्यांसाठी आनंद महिंद्रांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
“खेल आपने शुरू किया है, खत्म हम करेंगे”
संजय राऊतांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ, महाराष्ट्रानंतर आता गोव्यातही…
Comments are closed.