Top News राजकारण

शरद पवार मराठवाडाच्या दौऱ्यावर, शेतीच्या नुकसानीचा आढावा घेणार

पुणे | मुसळधार पावसामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये शेतातील पिकांचं फार नुकसान झालं आहे. दरम्यान शेतकऱ्यांचं झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मराठवाडा दौरा करणार आहेत.

शरद पवार हे दोन दिवसांच्या मराठवाड्याचा दौऱ्यावर जाणार आहेत. 18 आणि 19 ऑक्टोबर रोजी हा दोन दिवसांचा दौरा असणार आहे.

यावेळी तुळजापूर, उमरगा, औसा, परांडा, उस्मानाबाद याभागांना भेटी देऊन झालेल्या नुकसानाची पाहणी पवार करणार आहेत. दरम्यान अतिवृष्टीबाधितांना तातडीने मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेपूर्वी मिताली राजच्या टीमला धक्का, ‘ही’ खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह

पक्षांतराच्या चर्चांवर एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा, म्हणाले…

जलयुक्त शिवार योजना अत्यंत चांगली अन् लोकहिताची- पंकजा मुंडे

“कुणी कितीही आपटली तरी बॉलिवूडच्या केसाला धक्का लागणार नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या