बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवारांनी घरीच घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस; केलं ‘हे’ महत्वाचं आवाहन

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज घरीच कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. त्यांनी या संदर्भात ट्विट कलं आहे. तसेच लस घेतानाचे काही फोटो शेअर केले आहेत.

आज सकाळी कोविड-१९ लसीकरणाचा दुसरा डोस घेतला. डॉ. लहाने व त्यांच्या वैद्यकीय पथकाचे तसेच दोन्ही डोस कौशल्याने देणाऱ्या परिचारिका श्रीमती श्रद्धा मोरे यांचे मनापासून आभार!, असं शरद पवारांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

योगायोगाने आज जागतिक आरोग्य दिन आहे. या निमित्ताने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपणही कोविड लसीकरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून या विषाणूच्या लढाईत सक्रिय सहभाग नोंदवावा, असं आवाहनही शरद पवार यांनी केलं आहे.

दरम्यान, देशात 1 मार्चपासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला असून तिसऱ्या टप्प्यात 60 वर्ष पूर्ण केलेल्या जेष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे. त्यावेळी पहिल्याच दिवशी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर 37 दिवसांनी शरद पवार यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

 

 

थोडक्यात बातम्या- 

शिवभोजन थाळीसंदर्भात छगन भुजबळ यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडे केल्या ‘या’ महत्वाच्या मागण्या!

वाढीव वीज बिल येऊ द्यायचं नसेल तर ‘हे’ करा- नितीन राऊत

डॉ. आंबेडकर जयंतीला अभिवादनाचे कार्यक्रम साधेपणाने करा- उद्धव ठाकरे

“अनिल देशमुख यांच्यावरील आरोप गंभीर होते पण या आरोपांची सत्यता काय?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More