नवी दिल्ली | माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. सुषमा स्वराज यांच्या निधानंतर सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.
सुषमा स्वराज यांचं निधन धक्कादायक आहे. त्या मला शरद भाऊ असं म्हणून संबोधायच्या, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.
संसदीय सहकारी म्हणून त्यांची कारकिर्द पाहता आली. त्या उत्तम वक्त्या, कुशल प्रशासक आणि सहृदय व्यक्ती होत्या, अशा शब्दात शरद पवार यांनी सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
दरम्यान, सुषमाजींच्या जाण्याने भारतीय राजकारणातलं एक तेजोमय पर्व हरपलं, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केल्या आहेत.
सुषमा स्वराज यांचे निधन धक्कादायक आहे. त्या मला शरद भाऊ असं संबोधायच्या. संसदीय सहकारी म्हणून त्यांची कारकीर्द पाहता आली. त्या उत्तम वक्त्या, कुशल प्रशासक आणि सहृदय व्यक्ती होत्या. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 6, 2019
महत्वाच्या बातम्या-
-सुषमाजी, देश तुम्हाला कधीही विसरणार नाही- नरेंद्र मोदी
-मी या दिवसाची वाट पाहात होते; मृत्यूआधी केलेलं सुषमा स्वराज यांचं ट्विट व्हायरल
-माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन
-अभिनेत्री सई ताम्हणकरचे बोल्ड फोटो सोशल मीडियात व्हायरल
-अखेर कलम 370च्या मुद्द्यावर राहुल गांधींनी मौन सोडलं…
Comments are closed.