देश

जॉर्ज फर्नांडिस यांनी देशातील कामगार चळवळीला नवी दिशा दिली- शरद पवार

मुंबई | जॉर्ज फर्नांडिस यांनी देशातील कामगार चळवळीला नवी दिशा देण्याबरोबर ताकद देण्याचं काम केलं, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यांनी ट्विट करुन जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

1949 मध्ये मुंबईत आलेल्या जॉर्ज फर्नांडिस यांनी कामगार चळवळीत सहभाग घेत कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडत न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केला, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

कामगार आणि सर्वसामान्य जनतेसाठी आपलं जीवन अर्पण करणाऱ्या योद्धा नेत्याला आपण मुकलो आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, जॉर्ज फर्नांडिस यांच्या जाण्यानं सार्वजनिक जीवनातील जेष्ठ सहकारी गमावला आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. 

महत्वाच्या बातम्या-

ओवैसींना मोठा झटका, प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी कोर्टाचे तपासाचे आदेश

“आमीर खान, नवज्योतसिंह सिद्धू आणि नसीरुद्दीन शहा हे गद्दार आहेत”

-राहुल गांधी यांच्यात पंतप्रधान होण्याची क्षमता; उत्तर प्रदेशच्या मंत्र्याचं वक्तव्य

-बाप हा बाप असतो, बाप कसा बदलणार?, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

…तर भाजप खासदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार???

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या