नवी दिल्ली | केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी कृषी कायद्यांवर पुनर्विचार करण्याची मागणी सरकारकडे केली आहे.
सरकारने कृषी कायद्यांवर फेरविचार करायला हवा, हे कायदे चर्चेविना पारित झाले, सर्वांनी सरकारला यावर चर्चा करण्यास सांगितले होते. मात्र, सरकारने विरोधकांकडे दुर्लक्ष करत संसदेत घाई करून कृषी कायदे मंजूर केले, असे शरद पवार म्हणाले.
सध्या हे आंदोलन दिल्लीच्या सीमेपर्यंत मर्यादित आहे. योग्य वेळी निर्णय न घेतल्यास हे आंदोलन इतर ठिकाणी होईल, असे सांगत शरद पवार यांनी शेतकर्यांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये, अशी विनंती सरकारला केली आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग सोडावा आणि चर्चेसाठी पुढं यावं, असं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना केलं आहे.
थोडक्यात बातम्या-
पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा- राम कदम
सरकारी कार्यालयातून जिन्स आणि टी-शर्ट हद्दपार; सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता नवीन ड्रेस कोड
…म्हणून नवरदेवाने रागाच्या भरात केलं नवरीच्या बहिणीचं अपहरण!
“आमचे पवार साहेब महाराष्ट्राची शान आहेत, त्यांचा कोणी हातही धरु शकत नाही”
कोरिओग्राफर रेमो डिसूझा यांना हृदयविकाराचा झटका!