मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या सभेला जाणार नाहीत, अशी माहिती स्वत: शरद पवारांनी दिली आहे. ते साम टीव्हीशी बोलत होते.
आज (शनिवार) मनसेचा शिवाजी पार्कवर पाडवा मेळावा होत आहे. या मेळाव्याला राज ठाकरेंबरोबर शरद पवारसुद्धा उपस्थित राहतील, अशी शक्यता होती. एव्हाना अशी चर्चासुद्धा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती.
शुक्रवारी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेच्या पाडवा मेळाव्याला शुभेच्छा देखील दिल्या होत्या. मात्र स्वत: शरद पवारांनी सभेला जाणार नाही, असं स्पष्टीकरण दिल्याने यावर आता पडदा पडला आहे.
दरम्यान, आज संध्याकाळी 7 वाजता राज ठाकरे मनसैनिकांना पाडवा मेळाव्याच्या निमित्ताने संबोधित करणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-चेन्नईला मोठा धक्का; ‘हा’ महत्त्वाचा खेळाडू राहणार संघाबाहेर
–राहुल गांधी यांच्या विरोधात लढणार दोन ‘राहुल गांधी’
-बोलताना जरा मर्यादा राखा… सुषमा स्वराजांनी टोचले राहुल गांधींचे कान!
-‘न्याय’ योजनेसाठी लागणारा पैसा श्रीमंतांकडून वसूल करु- राहुल गांधी
–संजय राऊतांकडून छगन भुजबळांचा आसाराम बापु म्हणून उल्लेख!
Comments are closed.