महाराष्ट्र मुंबई

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 11 वाजता शरद पवार फेसबुकवरुन साधणार जनतेशी संवाद

Loading...

मुंबई | कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात आणि राज्यात वाढत आहे. देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी सकाळी 11 वाजता संवाद साधणार आहेत.

लोकांच्या मनात असलेली भीती दूर व्हावी या दृष्टीने हा संवाद असणार आहे. राज्यातील वैद्यकीय सुविधा, आर्थिक संकट, कृषी उत्पन्न, कायदा आणि सुव्यवस्था या पार्श्वभूमीवर शरद पवार हे जनतेशी संवाद साधतील.

Loading...

महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या 125 च्या वर गेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अनेकांच्या भीतीचं वातावरण आहे. काळजी घेण्याचं, घराबाहेर न पडण्याचं आवाहन दररोज केलं जातं आहे.

दरम्यान,. महाराष्ट्रातील जनता त्याचं पालनही करते आहे. अशात त्यांच्या मनातली भीती मात्र कायम आहे. ही भीती घालवण्यासाठीच शरद पवार हे फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

शिवसेना, राष्ट्रवादी आपल्या आमदार-खासदारांचे एक महिन्याचे वेतन सहाय्यता निधीला देणार

ज्ञानदा काय तुमच्या घरात कामाला आहे काय रे… ट्रोलर्सचा चाकणकरांनी घेतला यथेच्छ समाचार

महत्वाच्या बातम्या-

मशिदीत नमाजाला जाणाऱ्या मुस्लिम बांधवांना नवाब मलिकांची कळकळीची विनंती; म्हणतात…

राष्ट्रवादीचे सर्व आमदार खासदार एक महिन्याचा पगार सहाय्यता निधीला देणार

जिंदादिल बच्चू कडूंनी ओळखली सामाजिक जबाबदारी; एक महिन्याचा पगार देणार

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या