महाराष्ट्र मुंबई

दुष्काळी उपाययोजनांबाबत शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना दुसरे पत्र

मुंबई | दुष्काळी उपाययोजनांबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दुसरे पत्र लिहले आहे.या पत्रात त्यांनी दुष्काळ उपाययोजनांवर सरकारला सूचना दिल्या आहेत.

चाराछावणीसाठी प्रती जनावर दिले जाणारे अनुदान कमी असून त्यात वाढ करण्याची मागणी पवारांनी केली आहे. तसेच दौरा केलेल्या भागातील अनेक ठिकाणचे पाझर तलाव, मध्यम प्रकल्प दुरूस्त करण्याचीही मागणी पत्राद्वारे केली आहे. 2012-13च्या दुष्काळात हेक्टरी 35 हजार रूपये अनुदान दिले होते. तसेच अनुदान यावेळी देण्याची मागणी पत्रात करण्यात आली आहे.

शिधापत्रिकेवर धान्य मिळत नसल्याची आणि पीक वीमा भरूनही भरपाई मिळत नसल्याची तक्रार शरद पवार यांनी पत्राद्वारे केली आहे. दुष्काळग्रस्त भागात अद्याप रोजगार हमी योजनेची कामे सुरू झाली नाहीत, असं पवारांनी म्हटलं आहे.

दरम्याम, 4 मे रोजी शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पहिले पत्र पाठवले होते.

महत्वाच्या बातम्या

-“कोलकात्यातील हिंसाचाराला पश्चिम बंगालमधील सरकार जबाबदार”

-सीआरपीएफ नसते तर मी वाचू शकलो नसतो- अमित शहा

-मोदींच्या सभेस्थळी विकले ‘मोदी पकोडे’; पोलिसांनी केली अटक

-लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं, पण नवरीविना; मुलाची हृदयद्रावक कहाणी

-मी मुर्ख आहे पण इतकाही मोठा मुर्ख नाही- मणिशंकर अय्यर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या