बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

5 राज्यातील निकालांवर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मुंबई | देशातील पाच राज्यात सध्या विधानसभा निवडणूक 2022 चा रणसंग्राम सुरु असल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर हालचाली पहायला मिळत आहे. पाच राज्यांतील निकालावर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पाच राज्यातील निकालांवर मतमोजणी सुरु झाली असून निकालांचे पडसादही पडत असेलेले दिसत आहे. पाच राज्यांतील निकालांचा परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. याशिवाय त्यांनी गिरीश महाजनांनाही सडेतोड उत्तर देत म्हटलं की, महारष्ट्र बाकी है, तो महाराष्ट्र भी तैयार है.

पंजाब वगळता सगळीकडे भाजपची आघाडी दिसत आहे. नागरिकांनी भाजपला समर्थन देण्याचं ठरवलं आहे. दिल्लीत कृषी आंदोलन झालं यामध्ये हरियाणा आणि पंजाबमधील शेतकऱ्यांचा मोठा सहभाग होता. शेतकऱ्यांच्या मनात राग होता तो निवडणुकींमध्ये दिसून आला. त्यामुळे पंजाबमध्ये सत्ताबदल पहायला मिळाला, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पंजाब काँग्रेसमधला अंतर्गत वादाचा फटका काँग्रेसला बसला. याचा फायदा आपला झाल्याचं दिसून येत आहे. पंजाबमध्ये सत्ता आल्यास आपला सत्ता मिळालेलं हे दुसरं राज्य असेल, असंही पवार म्हणाले.

थोडक्यात बातम्या – 

“…अन् आता आम्ही थांबणार नाही, लोकसभाही लढू”

“उद्धव ठाकरे पेपर फुटल्यामुळे पास झालेले मुख्यमंत्री”

मोठी बातमी! निवडणूक निकालांचे पडसाद शेअर बाजारावर

‘उत्तरप्रदेश तो झाँकी है, महाराष्ट्र अभी बाकी है’; ‘या’ नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

पंजाबमध्ये सत्तापरिवर्तन; आपकडून काँग्रेसचा सुपडा साफ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More