बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवारांकडून अनिल देशमुखांची पाठराखन, विरोधकांवर निशाणा साधत म्हणाले…

मुंबई | महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना खंडणी वसूली प्रकरणी अटक करण्यात आली आहे. अनिल देशमुखांना अटक केल्यानंतर विरोधकांकडून भाजपवर जोरदार टीकेची झोड उठली. तसेच भाजपकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय, असा आरोपही करण्यात आला. आता या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनिल देशमुखांची पाठराखन करत त्यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने टाकलेल्या संपुर्ण जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या, असंही यावेळी बोलताना म्हटलं आहे. त्याचबरोबर शरद पवारांनी विरोधी भाजपवरही शरसंधान साधल्याचं पाहायला मिळालं.

‘अनिल देशमुखांना जेलमध्ये टाकल्याची किंमत आज ना उद्या वसूल झाल्याशिवाय राहणार नाही’, असं म्हणत शरद पवारांनी विरोधकांवर टीकेचे बाण सोडले. त्याचबरोबर ‘सत्ता आली की पाय जमिनीवर ठेवायचे पण ज्यांचे पाय जमिनीवर राहत नाहीत आणि सत्ता डोक्यात जाते, त्यांच्या हातून सत्ता गेल्यावर असं घडतं’, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

अनिल देशमुखांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीर उभा असल्याचं शरद पवारांनी बोलून दाखवलं. त्याचबरोबर बोलत असताना त्यांनी अनिल देशमुखांचं कौतूकही केलं आहे. त्यामुळे आता या राजकीय वातावरणातील घडामोडींमुळे टीका-प्रतिटीका, वाद-प्रतिवाद मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या

‘तिची लायकी नाही की…’, विजय वडेट्टीवारांनी भडकून केलं स्फोटक विधान

“मंत्री झगमगाटात पण विद्येचं माहेरघर अंधारात”

अभिनेता अनिकेत विश्वासराव विरोधात गुन्हा दाखल; पत्नीने केले ‘हे’ गंभीर आरोप

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरले, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर परिणाम काय?

ज्या न्यायाधीशांनी अनिल देशमुखांना घरचं जेवण नाकारलं त्यांना थेट बदली करूनच पाठवलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More