बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळत असल्याने केंद्र सरकारला पाहवत नाही’

अहमदनगर| शेवगाव तालुक्यातील केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे यांच्या जीवनावर आधारित विधीमंडळातील बबनराव ढाकणे या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवारांच्या हस्ते करण्यात आले.

पूर्वी केंद्र सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारे लोक होते. मात्र, आता तसे राहिले नाही. उलट शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळू लागले तर सध्याच्या केंद्र सरकारला पाहवत नाही, असा खोचक टोला शरद पवारांनी लगावला आहे. तसेच शेतकऱ्यांच्या हातात पैसे येऊ लागले की, धोरणं बदलली जातात, असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.

सध्याची साखर आणि गव्हातून शेतकऱ्यांना बरे पैसे मिळण्याची शक्यता होती. देशात गहू आणि साखरेचे उत्पादन जास्त असतानाही केंद्र सरकारने गहू आणि साखरेच्या निर्यातीवर बंदी आणली, अशी टीका शरद पवारांनी केली आहे. साखर कारखान्यांनी केंद्र सरकारचे बदलते धोरण पाहता साखरेसोबत अल्कोहोल, इथेनॉल आणि वीजनिर्मिती करावी, असं शरद पवारांनी सांगितलं.

दरम्यान, देशातील सहकारी साखर कारखानदारी वेगळ्या वळणावर असून देशात राबविण्यात येणारे सहकार धोरण याला कारणीभूत आहे, असं शरद पवारांनी म्हटलं आहे. आमच्याकडे केंद्रातील सत्ता होती. त्यावेळेस सहकाराची समज आणि आत्मियता असल्याने शेतकऱ्यांसाठीचे पोषक धोरण घेण्यात आले, असं शरद पवार म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

मोठी बातमी ! राज ठाकरेंवर 1 जूनला शस्त्रक्रिया होणार

उदयनराजेंनी रस्त्यावरील मुलीकडून सगळी पुस्तके विकत घेतली, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

‘मी माझे कपडे विकून लोकांना…’; पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं मोठं वक्तव्य

“किमान राजघराण्यातील व्यक्तींनी संज्यासारख्या फडतूस माणसाला…”

“नितीन गडकरी पंतप्रधान झाले असते तर रोजी रोटीचा प्रश्न मिटला असता”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More