बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राहुलचा मृत्यूआधीचा व्हिडीओ शेअर करत पत्नीने रूग्णालयावर केले आरोप, मरणापूर्वीचा व्हिडीओ आला समोर

नवी दिल्ली | कोरोना झाल्यावर वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे प्राण गमवावं लागल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. मात्र अशातचप्रसिद्ध अभिनेता आणि नाट्यकर्मी राहुल वोहराचं कोरोनाने निधन झालं होतं. शनिवारी त्याने जगाचा निरोप घेतला त्याच्या मृत्युनंतर त्याने लिहिलेल्या पोस्टमुळे अनेकांना धक्का बसला होता, त्याच्या पोस्टमुळे देश हळहळला होता. मात्र अशातच राहुलची पत्नी ज्योती तिवारीने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना ज्योती तिवारीने आपल्या पोस्टमध्ये राहुल वोहराच्या मृत्यूसाठी रुग्णालयाला जबाबदार धरले आहे. राहुल वोहरा याला कोरोनाची लागण झाल्यानंतर दिल्लीच्या ताहिरपूर येथील राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं होतं.

आजच्या काळात हे खूप महत्त्वाचं आहे. याच्याशिवाय माणूस आज जगू शकत नाही. यानंतर राहुल चेहऱ्यावर ऑक्सिजन मास्क लावतो. त्यानंतर तो ते मास्क काढतो. यामधून काहीच येत नाही. अटेंडेट आली होती. ती म्हणाली की, एक बाटली असते. त्यामध्ये पाणी येत-जात असतं. एवढं बोलून ती निघून जाते. त्यानंतर त्यांना पुन्हा आवाज द्यावा लागतो. त्यांना अनेकदा आवाज दिल्यानंतरही ते येत नाहीत. ते एक-दीड तासांनी येतात. तोपर्यंत मॅनेज करा. कुणाला सांगितलं तर ते सांगतात एक मिनिटात येत आहे. मी या खाली मास्कचं काय करु?, असं राहुल व्हिडीओमध्ये राहुलने सांगितलं आहे.

दरम्यान,  माझा राहुल गेला आहे, सर्वांना हे माहित आहे, परंतु तो कसा गेला हे कोणालाही माहिती नाही. राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ताहिरपूर दिल्ली, तिथे असेच वागणूक दिली जाते. मला आशा आहे की माझ्या पतीला न्याय मिळेल. अजून एक राहुल हे जग सोडू नये, असं ज्योतीने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Jyoti Tiwari (@ijyotitiwari)

थोडक्यात बातम्या- 

‘…हे पाहून अतिशय दु:ख होतय’; लालू प्रसाद यादव यांनी मोदींना सुनावलं

“अभिनेता अरबाज खानकडूनही परमबीर सिंह यांनी पैसे घेतले”

“मोदींनी देशाला चीनचा कचरा, चिंता आणि चिता हे तीन चि दिले”

“उद्धव ठाकरेंसारखा स्वातंत्र्य देणारा मुख्यमंत्री लाभला हे माझं नशीब”

कुठल्याही हमीशिवाय PPF खात्यावर मिळणार कर्ज; फक्त ‘या’ अटी करा पूर्ण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More