Top News

“माझा नवरा घाबरणारा नाही; भाजप डोळे मिटून दूध पिणारे मांजर”

मनसे |  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणी ईडीने नोटीस पाठवली आहे. यावरच राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. भाजप म्हणजे डोळे मिटून दूध पिणारे मांजर आहे. ते सुडाचे राजकारण करत आहे. आम्हाला असल्या प्रेमपत्रांची सवय आहे. आम्ही असल्या नोटिशींना भीक घालत नाही, असं शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं आहे.

सरकारचे आमच्यावर खूप प्रेम आहे. ईडी, सीबीआय यांच्या नोटिशींची आम्हाला सवय आहे. माझा नवरा घाबरणारा नाही. आम्हाला काही फरक पडणार नाही, असं त्या म्हणाल्या.

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मोदी-शहांविरूद्ध प्रचार करू नये, म्हणूनच ही नोटीस आली आहे, असंही त्या म्हणाल्या.

दरम्यान, राज यांना आलेल्या नोटीसीच्या निषेधार्थ 22 ऑगस्ट रोजी मनसेने ठाणे बंदची हाक दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-राज ठाकरे ईडी-बीडीला भीक घालत नाहीत… आमचा त्यांना पाठिंबा- राष्ट्रवादी

-“भारतीय कायदा म्हणजे प्रकाश आंबेडकरांच्या बापाची जहागीर नाही”

-काँग्रेसचा ‘हात’ झिडकारून या आमदार शिवसेनेत प्रवेश करणार!

-बाहेरच्या नेतृत्वाला नगरमध्ये ‘नो एन्ट्री’; विखे-पाटलांचा रोहित पवारांना इशारा

-स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कुणाची भीक नको; संभाजीराजेंनी तावडेंना सुनावलं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या