बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून आम्ही पहिल्या दिवशी पूरग्रस्तांकडे जाणं टाळलं- शर्मिला ठाकरे

मुंबई | कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पूरग्रस्तांना मदतीसाठी पहिल्याच दिवशी जायची इच्छा होती. पण राज ठाकरे यांनी आधी मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहोचू दे असं सांगितल्याने उशिरा भेट दिली, असं मनसे राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी सांगितलं आहे.

आपल्या जाण्यामुळे तिकडच्या मदत कार्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणून राज ठाकरे कुटुंबियांने पूरग्रस्तभागात जाणं टाळलं. मात्र मनसेची मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहोचली आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.

राज ठाकरे यांनी आवाहन केलं आणि मनसेचे अनेक ट्रक मदतीसाठी कोकणात पोहोचले. मदत सर्वांपर्यंत पोहोचेल यासाठी मनसेचे कार्यकर्ते काम करत आहेत. तिथल्या पोलिसांचंही फोन आले की मदत आली.. गाव दत्त घ्यायचं असेल तर त्यावर राज ठाकरे निर्णय घेतील. नदीची खोली वाढवली पाहिजे. त्यामुळे पुराचा धोका कमी होतो. तसेच धरणातील पाणी सोडताना त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं पाहिजे, असंही त्या म्हणाल्या.

दरम्यान, याआधी पूरग्रस्त कोकणवासीयांची सध्याची गरज ओळखून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी 1 हजार सोलापूरी चादरी कोकणाला पाठवल्या आहेत. सोलापूरातून 1 हजार चादरी कोकणला रवाना झाल्या आहेत. मनसे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्यावतीने या एक हजार सोलापुरी चादरींची मदत कोकणला देण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या-

राजकारणातील एका सत्वशील पर्वाचा अस्त; ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख काळाच्या पडद्याआड!

महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती सुधारतेय; पाहा आजचे सकारात्मक आकडे

दिलासादायक! पुण्यात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी घट

‘अहो, हे खरं असुच शकत नाही’; मीराबाई चानुच्या ‘त्या’ फोटोवर आर.माधवन म्हणतो…

अनिल देशमुख नॉट रिचेबल; ईडीकडून देशमुख कुटुंबाला समन्स, हजर न राहिल्यास…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More