Top News

“शाबास महिंद्रा, देशाच्या व्यवसाय क्षेत्राला अशाच नि:स्वार्थी नेतृत्वाची गरज!”

मुंबई | कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सरकारला मदतीचा हात देऊन पहिले उद्योजक म्हणून आनंद महिंद्रा यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे सर्व स्तरातून त्याचं मोठ्या प्रमाणात कौतूक होत आहे. अशातच काँग्रेस खासदार शशी थरूर यांनीही महिंद्रा याच्यावर कौतूकाची थाप टाकली आहे.

मी आनंद महिंद्रांना किशोरवयीन असल्यापासून ते हार्वर्डमध्ये शिक्षण घेत होते तेव्हापासून ओळखतो. पण हे ट्विट वाचण्याआधी मला त्यांचा इतका अभिमान कधीही वाटला नव्हता तेव्हा…आपल्या देशाला व्यवसाय क्षेत्रासह, जीवनातही अशाच दूरदृष्टी नि: स्वार्थी नेतृत्वाची गरज आहे. शाबाश., अशा शब्दात त्यांनी कौतूक केलं आहे.

आनंद महिंद्रा यांनी रोना संकटामुळे देशातील सध्याच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त करताना व्हेंटिलेटर्स बनवण्यापासून, Mahindra Holidaysचे रिसॉर्ट्स देण्यासह स्वतःचं 100टक्के वेतनही मदत म्हणून देणार आणि करोनामुळे फटका बसलेल्या छोट्या उद्योजकांच्या मदतीसाठी निधी उभारणार असल्याचं  महिंद्रा यांन सांगितलं.

दरम्यान, आमची प्रोजेक्ट टीम तात्पुरती काळजी सुविधा केंद्र उभारण्यात शासन आणि सैन्यदलास मदत करण्यास तयार असल्याचंही त्यांनी सांंगितलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विटद्वारे माहिती दिली आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

चीन अत्यंत गुप्त पद्धतीने वागतो; ट्रम्प चीनवर संतापले

मुंबईत कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू; मृतांचा आकडा 3 वर

महत्वाच्या बातम्या-

जिथून कोरोनाची सुरुवात झाली तिथून आली आनंदाची बातमी

दहा दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक; रक्तदान करण्याचं आरोग्यमंत्र्यांचं आवाहन

आरोग्यमंत्र्यांच्या ‘रक्तदानाच्या’ हाकेला युवक काँग्रेसचा प्रतिसाद; प्रदेशाध्यक्षांचं कार्यकर्त्यांना आवाहन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या