Top News महाराष्ट्र सातारा

“जेवढा त्रास पवारसाहेबांना द्याल, दुप्पट जनता तुम्हाला देईल”

सातारा | पदवीधर आणि आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालाने भाजपला चपराक बसली आहे. राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार पवारांच्या विचारांच्या पाठीशी उभे राहिले असल्याचं राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.

निवडणुकीच्या आधी ज्या अफवा पसरवल्या जात होत्या त्याकडे लक्ष न देता जनता पवारांच्या पाठीशी राहिली. त्यामुळे जेवढा त्रास पवारसाहेबांना द्याल त्याच्या दुप्पट जनता तुम्हाला देईल, असं शिंदे यांनी सांगितलं.

पुणे पदवीधर मतदारसंघाचे विजयी अरूण लाड यांना मतदान केल्याबद्दल साताऱ्यातील पदवीधरांचे आणि आभार मानतो, असं म्हणत शिंदेंनी साताऱ्यातील पदवीधरांचे आभार मानले.

दरम्यान, भाजपने बालेकिल्ला असलेले पुणे आणि नागपूर हे दोन मतदारसंघ गमावले आहेत. त्यामुळे भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

राज ठाकरेंनाही डिसले गुरुजींचा अभिमान, अशा शब्दात केलं कौतुक!

भारताला मोठा धक्का; हा स्टार खेळाडू झाला दुखापतग्रस्त!

अखेर मोदी सरकार नमलं; शेतकऱ्यांना दिली ‘ही’ परवानगी!

निलेश राणेंचं आक्षेपार्ह ट्विट; महाविकास आघाडीतील पक्षांना दिली ‘ही’ शिवी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या