नवी मुंबई | भाजप सत्तेत असताना मागची वर्षे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपाशी असल्यासारखे बसले होते, अशी बोचरी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेला आता राष्ट्रवादीच्या गोटातून प्रत्युत्तर दिलं जात आहे. राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांना इशारा दिला आहे.
पवारसाहेबांबद्दल विधान करताना जरा जपून विधान करावं. प्रदेशाध्यक्ष म्हणून काहीही वेड्यासारखं बरळू नये. नाही तर तुम्हाला तुमची उंची काय आहे हे दाखवावं लागेल, असा इशारा शशिकांत शिंदे यांनी पाटील यांना दिला आहे.
सत्ता नसल्यामुळे चंद्रकांत पाटील काहीही बरळत सुटले आहेत. सत्ता गेल्याचं सर्वात जास्त दुःख कोणाला झालं असेल तर ते चंद्रकांत पाटील यांना. कदाचित भविष्यातील मोठी संधी हुकल्याची त्यांना खंत असेल. त्यामुळे हल्ली काहीही वेड्यासारखे बरळत सुटले आहेत, अशी टीका शशिकांत शिंदे यांनी केली आहे.
पवारसाहेबांच्या बद्दल चंद्रकांत पाटील यांची गेल्या काही महिन्यांत सतत वेगवेगळी विधाने येत आहेत. एका बाजूला पवारांवर पीएचडी करायचं विधान करतात. एका बाजूला दुसरं काहीतरी विधान करतात. चंद्रकांत पाटलांना राजकारणाचा मागमूस आहे की नाही याची शंका यायला लागलीय. पवार साहेबांनी महाराष्ट्रात काय इतिहास घडवला हे तुम्ही पाहत होता, अशी आठवणही त्यांनी करून दिली आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
तुलामला का भेटायचं होतं?; राज ठाकरेंच्या प्रश्नावर चिमुकलीचं गोंडस उत्तर, पाहा व्हिडीओ
“आम्ही उपाशी आहेत की नाही हे जनता ठरवेल मात्र तुम्ही नेहमी कुपोषित दिसता”
महत्वाच्या बातम्या-
कोरोनामुळं कोणती पर्यटन आणि धार्मिक स्थळ बंद असतील; जाणून घ्या एका क्लिकवर
कोरोनामुळं निवडणूका पुढे ढकलाव्यात; राज्यसरकारची निवडणूक आयोगाला मागणी
पूर्णपणे शटडाऊन नको असेल तर स्वयंशिस्त पाळा- मुख्यमंत्री
Comments are closed.