बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ग्रामीण भागात लस मिळेना’; शशिकांत शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी

सातारा | सरकारने 18 वर्ष वयोगटावरील नागरिकांच्या लसीकरणाचा निर्णय घेतला आहे. परंतू राज्यात लसीचा तुटवडा जाणवू लागल्यानं सर्वत्र लस मिळणं अवघड झालं आहे. शहरी भागात लस लवकर उपलब्ध होत आहे. सातारा जिल्ह्यात आतापर्यंत 41% तर काही ठिकाणी 5% लसीकरण झाल्याचा रेफरन्स मिळत आहे. कुठेही 100% लसीकरण झालेलं नाही. त्यामुळेच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लसीबाबत एक मागणी केली आहे.

सध्या केंद्र व राज्य सरकारकडून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांनासुद्धा ऑनलाईन नोंदणी करून लस घ्यावी, असं सांगण्यात आलं आहे. त्या पद्धतीने नोंदणी होत असताना सातारा जिल्ह्यात होणारी लसीची नोंदणी पाहता जिल्ह्यामध्ये पुणे, मुंबईसह बाहेरील जिल्ह्यातील लोकांची मागणी असल्याचं आढळून येत आहे, असा आरोप शशिकांत शिंदे यांनी केला आहे.

जर अश्याप्रकारे बाहेरील लोकांची नोंदणी होत असेल तर सातारा जिल्ह्यातील लोकांना झालेल्या लसीकरणाचा आकडा फसवा व जास्त दिसून येईल,म्हणून राज्य सरकारने ऑनलाईन नोंदणी प्रणालीमध्ये बदल करून त्या जिल्ह्यातील लोकांची नोंदणी त्याच जिल्ह्यात होईल अशी व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

प्रत्येक जिल्ह्याला त्यांच्या लोकसंख्येनुसार लस उपलब्ध करून द्यावी. हे लसीकरण होताना 18 ते 45 वयोगटातील लोकांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह असल्यासच लस देण्यात यावी, जेणेकरून आधीच कमी असलेले लसीचे डोस वाया जाणार नाहीत, अश्या प्रकारची विनंती शशिकांत शिंदे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

थोडक्यात बातम्या-

लूडो गेम खेळण्याच्या बहाण्याने 55 वर्षीय नराधमाने 2 अल्पवयीन मुलींसोबत केलं ‘हे’ दुष्कृत्य

अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ; चांदिवाल समितीला दिवाणी अधिकार

‘या’ जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या साडेसात हजारांवरून थेट 3 हजारांवर

‘प्राण कंठाशी आलेल्या लोकांना वाली कोण?’; सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर कडाडून टीका

दिलासादायक! मुंबईतील कोरोनाबाधितांंच्या संख्येत घट; कोरोनामुक्तीचा दर 91 टक्यांवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More