नवी दिल्ली | देशात महागाई गगनाला भिडली असताना पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या (Gas Cylinder) दरात सातत्याने वाढ होत आहे. या दरवाढीवरून तृणमूल काँग्रेसचे नेते व अभिनेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे.
पश्चिम बंगालमधील (West Bengal) पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत सिन्हा यांनी मोदींवर टीका केली आहे. मोदी सरकार हुकुमशाही प्रवृत्तीचं आणि अहंकारी असल्याची टीका शत्रुघ्न सिन्हा यांनी केली आहे. तर सिन्हा यांनी देशाचे दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना देखील उजाळा दिला.
अटलबिहारी वाजपेयींच्या काळात आपण लोकशाही पाहिली. आता मोदींच्या काळात हुकुमशाहीचा अनुभव घेत आहोत, अशी खरमरीत टीका सिन्हा यांनी केली आहे. आपल्या मनात येईल तसं करायचं अशा हुकुमशाही प्रवृत्तीचं मोदी सरकार काम करत आहे, असा घणाघात देखील सिन्हा यांनी केला आहे.
दरम्यान, नऊ दिवसांत आठ वेळा इंधनाचे दर वाढवले हा अहंकारच आहे. हे सरकार अहकांरी सरकार आहे, असा टोला शत्रुघ्न सिन्हा यांनी लगावला आहे. तर याआधी कधी ऐकलं आहे का की पेट्रोल-डिझेलचे दर नऊ दिवसांत आठ वेळा वाढले?, असा सवाल देखील सिन्हा यांनी केला आहे.
थोडक्यात बातम्या-
“मुख्यमंत्र्यांचा कारभार भारी, माझे कुटुंब माझी जबाबदारी, बाकी सगळे फिरू दे दारोदारी”
Sharad Pawar: UPA अध्यक्षपदासाठी शरद पवारांचं नाव चर्चेत, रोहित पवार म्हणाले…
Narendra Modi: पंतप्रधान मोदी सर्वांत शक्तिशाली भारतीय; वाचा दुसऱ्या क्रमांकावर कोण?
मोठी बातमी! राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले, आता मास्क सक्तीही नाही
“तुमचे निर्बंध घाला चुलीत, हिंदू सणांवर बंधनं लादू नका”
Comments are closed.