‘चहावाला पंतप्रधान, अभिनेत्री मंत्री बनू शकते तर मी अर्थव्यवस्थेवर का बोलू शकत नाही?’

नवी दिल्ली | भाजपच्या ‘शत्रूं’चे वार काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. एक वकील अर्थमंत्री बनू शकतो, अभिनेत्री मंत्री बनू शकते, चहावाला पंतप्रधान बनू शकतो तर मी अर्थव्यवस्थेवर का बोलू शकत नाही, असा सवाल शत्रुघ्न सिन्हा यांनी विचारलाय. 

काँग्रेस नेते मनिष तिवारी यांच्या पुस्तकाचं काल प्रकाशन करण्यात आलं. यावेळी आयोजित परिसंवादात ते बोलत होते. 

जनतेमध्ये जीएसटी आणि नोटाबंदीमुळे असंतोष आहे. त्यामुळे गुजरात निवडणूक भाजपसाठी आव्हान आहे, असंही शत्रुघ्न सिन्हा यावेळी म्हणाले.