बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शेहनाज पहिल्यांदाच आली समोर, पाहा व्हिडीओ

मुंबई | अभिनेता सिद्धार्थ शुल्का याचं 2 ऑक्टोबर रोजी ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झालं. वयाच्या अवघ्या 40व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतल्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर चाहत्यांना काळजी लागून राहिली होती ती सिद्धार्थची मैत्रिण अभिनेत्री शेहनाज गीलची. सिद्धार्थच्या अकाली मृत्यूनंतर आता शेहनाज पहिल्यांदाच समोर आली आहे.

सिद्धार्थच्या निधनानंतर शेहनाजची अवस्था बघून चाहत्यांसहीत अगदी सेलिब्रिटींनाही मोठा धक्का बसला होता. शेजनाज कुठे आहे, कशी आहे असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडत होते. पण अखेर महिन्यानंतर शेहनाज समोर आली आहे. तिचा पंजाबी सिनेमा ‘हौंसला रख’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी शेहनाज बाहेर पडली आहे.

गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांज याने सिनेमाच्या प्रमोशनचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात शेहनाज गील देखील आहे. या सिनेमातील गाणं दसऱ्याच्या दिवशी रिलीज होणार आहे. त्याच्यासाठी शेहनाज, दिलजीत आणि सोनम बाजवा एकत्र आले आहेत. शेहनाजने पुन्हा कामाला सुरूवात केल्याने सिडनाजचे अर्थात सिद्धार्थ आणि शेहनाजचे चाहते मात्र आनंदी झालेत.

शेहनाजचा व्हिडीओ समोर येताच चाहत्यांनी सोशल मीडियावर ‘हौंसला रख शेहनाज’ ट्रेंड केलं. सिद्धार्थ आणि शेहनाजने बिग बॉसच्या 13व्या सिझनमध्ये एकत्र सहभाग घेतला होता. बिग बॉस दरम्यान त्यांची मैत्रीही खूप चर्चेत राहिली. शोनंतरही त्यांची तेवढीच घट्ट मैत्री पाहायला मिळाली. सिद्धार्थच्या निधनाने शेहनाजलाही मोठा धक्का बसला होता पण आता तिने नव्या जोमाने कामाला सुरूवात केेली आहे.

 

पाहा व्हिडीओ-

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by DILJIT DOSANJH (@diljitdosanjh)

 

थोडक्यात बातम्या-

काँग्रेसची दुखणी साध्या उपायांनी बरी होणार नाहीत- प्रशांत किशोर

अखेरचा चेंडू अन् 6 धावा; श्वास रोखून धरणाऱ्या सामन्यात विराटच्या शिलेदाराचा चमत्कार, पाहा व्हिडीओ

“दोषींवर कारवाई होईपर्यंत मी जागेवरून हालणार नाही”

असं काय झालं की, रतन टाटांना आली जेआरडी टाटांची आठवण!

“वसूली आली की सरकारचा ससा होतो अन् शेतकऱ्यांना मदत म्हटलं की कासव”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More