बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“‘शेरशाह’ चित्रपट करून चूक केली, असं मला वाटू लागलं आहे”

मुंबई | बॉलिवुड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिकेत असणारा ‘शेरशाह’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. कारगील युद्धाचे रिअल हिरो कॅप्टन विक्रम बन्ना यांच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट आहे. अभिनेता साहिल वैद यांनी या चित्रपटात ‘सनी’ची भूमिका केली आहे. मात्र चित्रपटाच्या रिलीजनंतर आता साहिला चित्रपटात काम केल्याने पश्चाताप होत आहे. त्याबाबत त्यांनी त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

देशातील सैनिकांवर आधारीत असलेल्या या चित्रपटाची चर्चा भारतात खुप होत आहे. हा चित्रपट हिट करण्यासाठी चित्रपटातील सगळ्या कलाकरांनी मेहनत घेतली. परंतु देशात सर्वात जास्त चर्चा ही सिद्धार्थ मल्होत्राचीच होत आहे. चित्रपटाचं सर्व श्रेय हे फक्त सिद्धार्थ मल्होत्रालाच मिळत असल्याचंही साहिल वैद यांनी सांगितलं आहे.

माझी या चित्रपटात युद्धांच्या सीनमध्ये सहभागी होण्याची इच्छा होती. परंतु दिग्दर्शकाने मला मित्र सनीच्या भूमिका करण्यासाठी सांगितलं होतं. चित्रपट हिट झाला असला तरीही हे दु:ख माझ्या मनात कायम आहे. प्रेक्षकांनी चित्रपटातील सहाय्यक कास्टकडे दुर्लक्ष केलं होतं. तरीही चित्रपटात अनेक कलाकारांनी आपला इगो बाजूला ठेऊन छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या.  खंर तर या कामांमधून शहिद कॅप्टन विक्रम बन्ना या श्रद्धांजली द्यायची होती म्हणून मी हा चित्रपट साईन केला, असंही साहिल वैद म्हणाला.

दरम्यान, ‘शेहशाह’ हा चित्रपट भारतीय दिग्दर्शक आणि अभिनेता करण जोहर आणि त्याच्या धर्मा प्रॉडक्शननी तयार केला आहे. तर हा चित्रपट प्रसिध्द बॉलिवुड दिग्दर्शक विष्णु वर्धन यांनी दिग्दर्शित केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘अजितदादा काय म्हणतात त्याला….’; अजित पवारांच्या टीकेला पडळकरांचं जोरदार प्रत्युत्तर!

अफगाणिस्तानातील भारतीयांसाठी केंद्राची हालचाल??; उचललं ‘हे’ मोठं पाऊल!

बांद्राच्या कॅफेत सनी लिओनीची ‘खास’ झलक, पाहा व्हिडीओ!

दुबईमध्ये होणाऱ्या आयपीएलमधून ‘हे’ खेळाडू बाहेर, पाहा व्हिडीओ

लोकहो सावध राहा! तिसऱ्या लाटेबाबत नीती आयोगाचा अत्यंत गंभीर इशारा, पाहा व्हिडीओ

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More